Admission
एकलव्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा उंबरठाण शाळेत सन- २०२५-२६ ह्या वर्षाकरिता इयत्ता १ ली ते १२ वी साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे.
शाळेची वैशिष्ट्ये:
- दर्जेदार शिक्षण: अनुभवी आणि कुशल शिक्षकांकडून शिक्षण.
- मोफत सुविधा: निवास, भोजन, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मोफत.
- खेळ आणि सांस्कृतिक उपक्रम: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन.
- आधुनिक सुविधा: सुसज्ज वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि संगणक कक्ष.
- सुरक्षित वातावरण: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकाची व्यवस्था.
- पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण अशी E Learning व्यवस्था.
प्रवेशासाठी पात्रता:
- अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थी.
- इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असावे.
- इतर वर्गांसाठी मागील इयत्तेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.
प्रवेश प्रक्रिया:
- प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
- प्रवेश अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह शाळेत जमा करावेत.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड.
- जन्म दाखला.
- जात प्रमाणपत्र.
- मागील शाळेचा दाखला.
- इयत्ता १ ते ८ साठी मागील इयत्तेची संचयिका आवश्यक.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
प्रवेशासाठी संपर्क:
- एकलव्य प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, उंबरठाण, तालुका - सुरगाणा, जिल्हा - नाशिक .
- संपर्क क्रमांक: श्री. भावसार पी. एस. ९५८८६८७१६८
- प्रवेशासाठी अंतिम तारीख: ३० जून २०२५.